संगमेश्वरात भाजी खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:44 IST2020-04-06T21:44:12+5:302020-04-06T21:44:35+5:30

मालेगाव : सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना शहरातील संगमेश्वर भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे.

Rush to buy vegetables at Sangameshwar | संगमेश्वरात भाजी खरेदीसाठी गर्दी

संगमेश्वरात भाजी खरेदीसाठी गर्दी

ठळक मुद्देनागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.

मालेगाव : सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना शहरातील संगमेश्वर भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. सुदैवाने शहरात अजून तरी कोरोनाच्या रुग्ण आढळलेला नाही ही जमेची बाजू असताना काळजी घेतली पाहिजे. महापालिका प्रशासन विभागाने गर्दीकडे लक्ष देऊन लोकांना गर्दीपासून दूर केले पाहिजे. संगमेश्वरात सोमवारी पहाटे ६ वाजता सांडवा पूल ते संगमेश्वर पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यावर भाजीपाला खरेदी-विक्री करणारे व नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती.

Web Title: Rush to buy vegetables at Sangameshwar