मासिक बैठकांना गटविकास अधिकारी राहणार उपस्थित उषा बच्छाव यांना ग्रामविकास विभागाचे पत्र
By Admin | Updated: April 7, 2015 01:45 IST2015-04-07T01:44:43+5:302015-04-07T01:45:24+5:30
मासिक बैठकांना गटविकास अधिकारी राहणार उपस्थित उषा बच्छाव यांना ग्रामविकास विभागाचे पत्र

मासिक बैठकांना गटविकास अधिकारी राहणार उपस्थित उषा बच्छाव यांना ग्रामविकास विभागाचे पत्र
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकांना अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने काढले आहेत. समाजकल्याण समिती सभापती उषा बच्छाव यांनी यासंदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना निवेदन दिले होते. काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सभापती उषा बच्छाव यांनी निवेदन देऊन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या मासिक बैठकांना अतिरिक्त गटविकास अधिकारी यांना बोलाविले तरीही ते बैठकांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या एकूणच कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे समाजकल्याण समितीच्या जिल्हास्तरीय बैठकांना अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत शासन स्तरावरून आदेश देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार शासनाच्या २५ मार्चच्या शासन परिपत्रकामुळे समाजकल्याण समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत कामकाजाचा आढावा सादर करण्यासाठी अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांनी बैठकांना उपस्थित राहण्याबाबत आदेश दिले आहेत.(प्रतिनिधी)