लोणवाडी येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:21 IST2019-04-30T18:20:39+5:302019-04-30T18:21:58+5:30
लोणवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घालून तिन वासरे फस्त केली आहेत.

लोणवाडी येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
पिंपळगाव बसवंत : लोणवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घालून तिन वासरे फस्त केली आहेत.
लोणवाडी येथे निफाड पिंपळगाव रस्ता वर उघड्यावर मांस विक्र ी होत असल्याने या ठिकाणी भटक्या कुत्र्याचा संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम या ठिकाणी राहणारे शेतकरी याच्या वस्तीवरीर ल रतन महादु दौÞंड यांच्या गायीचे दोन महिन्यांचे वासरू गोठ्याच्या जाळीतून ओढून नेले आणि ते फस्त केले. अशीच घटना या आगोदर बाळासाहेब लभडे यांच्या वस्तीवर घडली आहे. हे प्रकार थांबण्यासाठी उघड्या वरील मांस विक्री बंद करण्याची मागणी तंटा मुक्त समिती चे श्रीराम दौड, विकास बनकर,प्रकाश दौड, नितीन खैरनार,प्रमोद बनकर, श्रीकांत दौड, भाऊसाहेब दौड आदिंनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.