पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.कांदा, गहू फ्लॉवर आदीसारख्या पिकांना उन्हाच्या तीव्रतेचा झटका बसून पिके होरपळून निघत आहे. येवला तालुक्याच्या काही भागात दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहीरी तळ गाठतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात पालखेड कालव्याचे आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.सध्या चहुकडे उन्हाची लाहीलाही होत असल्याने रब्बी हंगामातील गहु, कांदा, हरभरा हे पिके येवल्याच्या पश्चिमेकडील धुळगांव, भाटगांव, सातारे, शेवगे, पिंपळगाव लेप, जऊळके, मानोरी, शिरसगांव लौकी या भागात प्रामुख्याने घेतली जातात. मात्र यांचे जीवन हे पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असते. त्या भरवशावर शेतकरी लागवडी करतात.परंतु फेब्रुवारी महिन्यापासून पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने कांदा पिकाची लाही-लाही होतांना दिसत आहे. काद्यांना सध्या बरे भाव मिळत आहे.परंतु काद्यांना भरण्यासाठी पाणी शिल्लक नाही या चिंतेने शेतकरी भयभित झाला आहे. पाण्याअभावी कांदे हाताबाहेर गेल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.या आठवड्यात पालखेड डावा कालव्याचे पाणी नाही सुटले तर कांदा पिकाचे नुकसान होईल म्हणून पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेऊन पालखेड डावा कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडावे अशी मागणी भाजपा शाखा प्रमुख नामदेव दौंडे, प्रहार शाखा प्रमुख गोकुळ ठुबे, माजी सरपंच मधुकर साळवे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती माजी तालुकाअध्यक्ष बाळासाहेब दौंडे,अशोक दौंडे, मधुकर ढोकळे, संतोष ढोकळे, सुकदेव ढोकळे, विलास दुनबळे, आप्पा गोधडे, रघुनाथ काळे, बापु पोटे, प्रविण काळे, शंकर काळे, दत्तु पोटे, सुनिल ढोकळेआदींनी केली आहे.कोट...जवळपास तीन-चार एकर कांद्याची लागवड केली. परंतु सध्या मात्र विहिरींनी तळ गाठल्याने दोन पाण्यावर अवलंबून असलेले कांदे होरपळून निघत नसल्याने माझ्या तोंडचे पाणीच पळाले आहे. तात्काळ पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची दखल घेऊन पाणी सोडावे.-अशोक दौंडे, शेतकरी.(०७ पिपळगाव लेप)पिंपळगाव लेप परिसरात पाण्याअभावी होरपळून निघालेले फ्लॉवरचे पिक.
पिकांना पाणी नसल्याने कालव्याकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 18:57 IST
पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.
पिकांना पाणी नसल्याने कालव्याकडे धाव
ठळक मुद्देपिंपळगाव लेप परिसरात पिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांची अडचण