शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 6:03 PM

शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली

ठळक मुद्देगंगापूररोड, आंनदवल्ली शिवार, पाईपलाइन रोड याभागात गर्दी नागरिकांनी सावधगिरीने व जबाबदारीने वागण्याची गरजपश्चिम वनविभाग, पोलीस नियंत्रण कक्ष याबाबत सतर्क

नाशिक : सावरकरनगरमध्ये आठवडाभरापुर्वी वनविभागानेबिबट्याला यशस्वीपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर शहरात विविध भागांमध्ये बिबट्याने दर्शन असे सांगत बिबट्याचे खोटे छायाचित्र इंटरनेटच्या माध्यमातून मिळवत नेटिझन्स्कडून सोशलमिडीयावर पसरविण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांमध्ये विनाकारण घबराट शनिवारी (दि.२) पसरली. गंगापूररोड, आंनदवल्ली शिवार, पाईपलाइन रोड याभागात नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाने या भागात बिबट्याच्या दर्शनाची बातमी खोटी असल्याचे निष्पन्न केले आहे.सावरकरनगरमध्ये अनावधानाने शिरलेल्या बिबट्यामुळे नाशिककरांची पाचावर धारण बसली आहे. नागरिकांनी सावधगिरीने व जबाबदारीने वागण्याची खरी गरज असली तरीदेखील काही अतीउत्साही नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर बिबट्याच्या दर्शनाच्या बातम्या नव्हे तर निव्वळ अफवा पसरविल्या जात असल्यामुळे गंगापूररोड परिसरात दहशतीचे वातावरण तयार होत आहे. सोशलमिडियाचा जबाबदारीने वापर करण्याची आवश्यकता असून बेभानपणे अनावश्यक माहिती व छायाचित्रे खात्री न करता पुढे पाठवू नये असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले आहे.शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली. कोणी म्हणे एका खासगी शाळेच्या आवारात बिबट्या शिरला तर कोणी एकाने अफवा पसरविली की येथील नाल्यातून पळत गेला त्यामुळे बघ्यांची येथे गर्दी झाली होती. याबाबतची माहिती वनविभाग नाशिक पश्चिमला मिळताच वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, सचिन आहेर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संपुर्ण परिसर वनकर्मचा-यांनी पिंजून काढत पाऊलखुणा कोठेही आढळून आल्या नाहीत. नाशिक पश्चिम वनविभाग, पोलीस नियंत्रण कक्ष याबाबत सतर्क असून सातत्याने सातपूर वनपरिक्षेत्र, नाशिक वनपरिक्षेत्रात वनकर्मचारी गस्तीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे बिबट्याविषयीच्या अफवा पसरविणे टाळावे, जेणेकरुन जनतेची व प्रशासनाची दिशाभूल टाळण्यास मदत होईल.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभाग