पालिकेच्या घरकुल विक्रीची अफवा

By Admin | Updated: August 6, 2014 01:59 IST2014-08-06T01:49:02+5:302014-08-06T01:59:59+5:30

पालिकेच्या घरकुल विक्रीची अफवा

Rumors of the sale of the crib | पालिकेच्या घरकुल विक्रीची अफवा

पालिकेच्या घरकुल विक्रीची अफवा

 

नाशिक : पालिकेची तयार घरकुलेच चक्क विक्रीला काढून अनेक भामटे झोपडपट्टीवासीयांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेचे कोणतेही घरकुल विक्रीसाठी नसून त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेच्या वतीने सध्या घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांची विविध निकषांदसारे निवड केली जाते. परंतु अनेक नागरिकांना ही घरकुले विक्रीसाठी असल्याचे सांगून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rumors of the sale of the crib