Rugged suspected dengue in Bhagur | भगूरमध्ये डेंग्यूचे संशयित रु ग्ण

भगूरमध्ये डेंग्यूचे संशयित रु ग्ण

भगूर : भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयित
रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी  रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे.
अनेक अडचणींना तोड द्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. भगूर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी भगूरमध्ये सहा महिन्यांमध्ये सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आता तीन वर्षे पूर्ण झाले तरी हॉस्पिटल नसल्याने डेंग्यूच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. भगूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरमध्ये डेंग्यूची लागण झाली असून, केवळ दहा संशयित
रु ग्ण भरती झालेले आहेत. अन्य रुग्ण जागेअभावी इतर दवाखान्यात असावेत. नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य निरीक्षक एन. के. शेख यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील औषध फवारणी तीन मशीन असून, ते नादुरुस्त झालेले आहे. बºयाच ठिकाणी फवारणीही झालेली नाही. त्यामुळे भगूर परिसरात डेंग्यूचे
रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. भगूरमध्ये रुग्णालयाचे सुविधा नसल्याने भगूर गावातील नागरिक देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, बिटको हॉस्पिटलसह काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्येही मध्ये औषध उपचारासाठी दाखल झाले आहेत.
देवळालीकॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये भगूर परिसरातील डेंग्यू, मलेरिया, टायफड, उलटी, जुलाब अशा आजारांचे शंभर पेक्षा जास्त रु ग्ण जून, जुलै, आॅगस्ट महिन्यांत जास्त कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सर्वांत जास्त भगूरचे
रुग्ण आढळून आले. तसेच भगूरमधील अनेक खासगी दवाखान्यातही या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. भगूर येथील लॅब फी व तपासणी फी जास्त आकारली जाते. भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील व नगरसेवक यांचे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष झाल्याने भगूरचे नागरिकांना डेंग्यूच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भगूर येथील डेंग्यूचे रु ग्ण कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला दाखल आहेत.
नालेसफाईचा अभाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल व भगूर नगरपरिषद यांना दोन वर्षांपूर्वी पत्र देऊन सांगितले होते की, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण होती. त्यासाठी नालेसाफसफाई करावी. स्थानिक संस्थेने हे न केल्याने डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी नगरसेवक जिल्हाधिकारी यांनी यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रतन चावला व कार्यकर्त्यांनी केली आहे.
भगूर परिसरामध्ये औषध फवारणी नाही तसेच ठिकठिकाणी उगवलेले गाजर गवत, नालेसफाई नाही, ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे डास, यामुळे डेंग्यूची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे.

Web Title:  Rugged suspected dengue in Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.