शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ४४६ शाळांमधील ५ हजार ५४६ जागांसाठी आरटीई अर्जप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 21:50 IST

आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ४४६ शाळांमध्ये ५ हजार ५४६ जागा उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे12 ते 29 फेब्रुवारीदरम्यान आरटीईसाठी अर्ज करण्याची संधी नाशिक जिल्ह्यातील 446 शाळांमध्ये 5546 जागा

नाशिक : समाजातील आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवार (दि.१२)पासून अर्ज करण्याची संधी पालकांना उपलब्ध होणार आहे. आरटीई प्रक्रियेत आतापर्यंत नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील ४४६ शाळांमध्ये ५ हजार ५४६ जागा उपलब्ध आहे. या राखीव जागांवर प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलसह मोबाईल अ‍ॅपची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२०ची आरटीई प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्यासाठी  २९ फेब्रुवारीपर्यंत आरटीई संकेतस्थळावरसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत सहभागी होताना पालकांना आरटीई पोर्टलवर सुरुवातीला पाल्याची जन्मतारीख व नावासह मूळ माहिती अद्यावत करून नोंदणी करून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना पालक व त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून १ व ३ किमी आणि अधिक अंतरा पर्यंतच्या उपलब्ध असणाºया फक्त १० शाळांचे पर्याय निवडण्याचे स्वांतत्र आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर एका विद्यार्थ्यांसाठी एकच अर्ज करता येणार असून पालकांना  मदत केंद्र, सायबर कॅफे अथवा मोबाइलवर आरटीईचे अ‍ॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करावयाचे नाहीत. मात्र, रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, बालकाचे जन्म दिनांकांची नोंद करण्यासाठी जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास आर्थिक वर्ष २०१७-१८/२०१८-१९ या  वषार्चा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांचे संकलन आवश्यक असून आरटीईच्या सोडतीत नाव आल्यानंतर ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा