शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

जून उलटूनही आरटीई प्रवेश शून्यावरच; शाळास्तरावरच प्रक्रियेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:13 IST

आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली. मात्र संपूर्ण जूननंतर जुलैचा पहिला आठवडा उलटूनही राज्यभरात आरटीई अंतर्गत एकही प्रवेश निश्चत होऊ शकलेला नाही. प्रतिवषी सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या पुणे व ठाणे जिल्ह्यांसह नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि रायगडसारख्या जिल्ह्यातही हिच स्थिती आहे. 

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली. मात्र संपूर्ण जूननंतर जुलैचा पहिला आठवडा उलटूनही राज्यभरात आरटीई अंतर्गत एकही प्रवेश निश्चत होऊ शकलेला नाही. प्रतिवषी सर्वाधिक प्रवेश होणाऱ्या पुणे व ठाणे जिल्ह्यांसह नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि रायगडसारख्या जिल्ह्यातही हिच स्थिती आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रक्रियेत यावर्षी बदल केला आहे. कें द्र स्तरावर होणाºया पडताळणी शाळास्तरावर प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार आहे. परंतु, अद्याप शाळांचा स्थानिक स्तरावर त्यांचे वेळापत्रक निश्चित करून प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया राबविण्याचा गोंधळ सुरू आहे. शाळास्तरावरच प्रवेशाची प्राथमिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार असल्याने आतापर्यंतच्या प्रक्रियेविषयी शिक्षण विभागाचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत. राज्यभरात एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला नसल्याचे आरटीईच्या संकेटस्थळावरून स्पष्ट होते. यापूर्वी १७ व १८ मार्चला आॅनलाइन लॉटरी काढल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे, अशा विद्यार्थ्यांना एसएमस प्राप्त झाले आहेत. राज्यात आरटीईअंतर्गत एकूण ९ हजार ३३१ शाळांमध्ये १ लाख १५ हजार ४४९ जागा आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असून त्यासाठी १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची लॉटीच्या माध्यमातून निवड झाली आहे. परंतु, अनेक शाळांकडून अजूनही प्रवेश प्रक्रियेचा प्राथमिक स्तरावरच गोंधळ सुरू असल्याने या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाना पाल्यांचे प्रवेश निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे. 

राखीव जागांचे प्रमाण वाढण्याची भिती खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत आरटीई अंतर्गत राखीव जागांचे प्रमाण वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या भितीमुळे प्रतिवर्षीच्या तुलनेत यावर्षी शाळांमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांपैकी आरटीई व्यतिरिक्त जागांवर पूर्ण प्रवेश झाले नाही तर एकूण प्रवेशाच्या तुलनेत आरटीईचे प्रमाण वाढण्याची भिती शाळांना आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळते, उर्वरित खर्चाचा बोजा शाळेलाच सहन करावा लागत असल्याने त्यासाठी निधी आणायचा कसा असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थीSchoolशाळा