नाशिक: शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. यातील ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता लवकरच आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाºया विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांचे वय ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत नर्सरीसाठी ३ वर्ष पूर्ण व पहिलीसाठी ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रकियेविषयी व्हॉट्स अॅप/फेसबुक यांसारख्या सोशल मीडियामध्ये येणाºया पोस्टवर विश्वास न ठेवता १३ी25ंे्रि२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणारे वेळापत्रक व सूचनांप्रमाणे अर्ज प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान, २०१९-२० शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन शासन निर्णय निर्गमित होणार असून त्यानंतर शिक्षण विभागाकडून अद्यावत माहिती दिली जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रेरहिवासी पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वडील किंवा विद्यार्थी यांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पत्त्याच्या पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच वर्ष १७-१८ चा १ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच सिव्हिल सर्जन यांचा दाखला आवश्यक आहे.
फेब्रुवारीपासून सुरू होणार आरटीई प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 19:24 IST
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहेत. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील विविध ४६६ शाळांमध्ये ६५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी प्राप्त ११ हजार ११८ अर्जांपैकी चार प्रवेश फेºयांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली होती. यातील ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
फेब्रुवारीपासून सुरू होणार आरटीई प्रवेश प्रक्रिया
ठळक मुद्देआरटीई प्रवेश प्रक्रियेला फेब्रुवारीपासून सुरुवात शिक्षण विभागाकडून आवश्यक कागदपत्र उपलब्ध करण्याचे आवाहन