शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

महिला नगरसेवकांचा महासभेत रौद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:28 AM

अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर कारवाई करत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना घरचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत महासभेत सोमवारी (दि.१९) अंतिम टप्प्यात महिला नगरसेवकांनी आक्रमक होत रौद्रावतार धारण केला.

नाशिक : अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर कारवाई करत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना घरचा रस्ता दाखविल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करत महासभेत सोमवारी (दि.१९) अंतिम टप्प्यात महिला नगरसेवकांनी आक्रमक होत रौद्रावतार धारण केला. सभागृहातील सर्व महिला नगरसेवकांनी महापौरांच्या पीठावर जाऊन ठिय्या देत निदर्शने केली. यावेळी सभागृहातील पुरुष सदस्यांनी ‘नारी शक्तीचा विजय असो’, ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी महापौरांनी अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांची संधी देण्याचे आदेश देत पुढचा विषय चर्चिला.मनपा हद्दीतील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देणे, मुलांना शिष्यवृत्ती देणे, अनाथ मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान देणे आदींबाबत दोन कोटी रुपयांच्या निधी अथवा जास्त अर्ज आल्यास जादा खर्चासह योजनांची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्याबाबतचा महासभेच्या विषयपत्रिकेतील १३५ क्रमांकाचा विषय पटलावर आला. यावेळी नगरसेवक प्रियंका माने यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या उदरनिर्वाहाचे काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांना अंगणवाड्या सुरू होणार की नाही? असा प्रश्न मुंडे यांना विचारला. यावेळी त्यांनी मौन धारण केले. अवघ्या क्षणार्धात सभागृहातील सर्वच पक्षांच्या महिला सदस्यांनी जागा सोडून जोरदार घोषणाबाजी करत महापौरांच्या पीठासनाचा ताबा घेतला.महापौरही आक्रमकआंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आणि सभागृह घोषणांनी दणाणून गेले. अखेर महापौर भानसी यांनीही आक्रमक होत तीन महिने संधी देण्याचे मान्य करत आदेश दिल्यानंतर पीठासनाचा ताबा महिला सदस्यांनी सोडला. या आंदोलनात नगरसेवक वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, प्रतिभा पवार, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर, समीना मेमन, सुषमा पगारे, आशा तडवी, शाहिन मिर्झा, वर्षा भालेराव, स्वाती भामरे आदिंनी सहभाग घेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWomenमहिला