रोटरी क्लब अंबडचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:13 IST2018-07-15T22:55:38+5:302018-07-16T00:13:24+5:30

सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबड या संस्थेच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून जयंत पवार, तर चिटणीस म्हणून संतोष भट यांनी सूत्रे हाती घेतली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री नीलिमा मिश्रा, प्रांतपाल राजेंद्र भामरे उपस्थित होते.

 Rotary Club Ambad's takeover | रोटरी क्लब अंबडचे पदग्रहण

रोटरी क्लब अंबडचे पदग्रहण

ठळक मुद्देअध्यक्षपदी जयंत पवार, तर चिटणीसपदी संतोष भट

सिडको : रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबड या संस्थेच्या नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष म्हणून जयंत पवार, तर चिटणीस म्हणून संतोष भट यांनी सूत्रे हाती घेतली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री नीलिमा मिश्रा, प्रांतपाल राजेंद्र भामरे उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष विपूल लोडया यांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रमुख अतिथी पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विविध संस्थांच्या माध्यमातून ४० हजार ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार योजनांची माहिती दिली आहे. महिलांचे आर्थिकीकरण किती गरजेचे आहे, हे उदाहरण देऊन पटवून सांगत महिलांनी या योजनांची माहिती दिली.
यावेळी मावळते अध्यक्ष विपूल लोडया यांनी त्यांच्याकडील पदभार नूतन अध्यक्ष जयंत पवार यांच्याकडे सोपविला. जयंत पवार यांनीदेखील, आगामी काळात रोटरी क्लब आॅफ नाशिक-अंबडच्या माध्यमातून सर्व रोटरियन यांनाबरोबर घेत भरीव काम करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अजित भामरे, माजी प्रांतपाल डी. एस. देशमुख, मेजर झरेकर, निकम, टी. एस. पाटील, मेजर पिल्ले, जे. एम. पवार, भास्कर पवार, कॅप्टन बारीक, अनंत आदी उपस्थित होते.

Web Title:  Rotary Club Ambad's takeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.