सप्तशृंगी गडावरील रोपवेसेवा बुधवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:35 PM2019-09-09T18:35:52+5:302019-09-09T18:39:08+5:30

तांत्रिक दुरु स्तीसाठी एक दिवसांकरिता बंद

 Ropeway service at the Saptashringi fort closed tomorrow | सप्तशृंगी गडावरील रोपवेसेवा बुधवारी बंद

सप्तशृंगी गडावरील रोपवेसेवा बुधवारी बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे हि सेवा सुरु झाल्यापासून देखभाल दुरु स्ती केलेली नसल्याने बुधवारी वार्षिक तांत्रिक दुरु स्तीकरीता रोपवे सेवा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

कळवण - सप्तशृंगी गडावरील फ्युनिक्युलर रोपवेची सेवा बुधवारी (दि.११)तांत्रिक दुरु स्तीसाठी एक दिवसांकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती फ्युनिक्युलर रोपवेजचे व्यवस्थापक राजीव लुंबा यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
साडेतीन शक्तीापीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर देवीच्या दर्शनासाठी बाराही महिने भाविकांची गर्दी असते. ज्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून चालत जाणे शक्य नाही, त्या भाविकांसाठी फ्युनिक्युलर रोपवे ट्रॉली उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे अपंग, जेष्ठ नागरिक ,लहान मुले तसेच महिला या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. हि सेवा सुरु झाल्यापासून देखभाल दुरु स्ती केलेली नसल्याने बुधवारी वार्षिक तांत्रिक दुरु स्तीकरीता रोपवे सेवा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title:  Ropeway service at the Saptashringi fort closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक