शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:40 IST

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केलेली असताना राष्टवादीदेखील ही आपलीच जागा असे समजून कामाला लागली आहे.आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा विचार करता २००९ प्रमाणे जागावाटप झाल्यास चांदवड मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याला दिला जाईल, असे सांगितले जाते, परंतु कॉँग्रेसला ते मान्य नाही. यंदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस या मतदारसंघावर दावा सांगत आहे. तर राष्टवादीने आपला दावा भक्कम करताना २००४च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. २००४ मध्ये राष्टवादी कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानंतर या मतदारसंघावर राष्टÑवादीचे वर्चस्व होते. परंतु २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला व काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला असला तरी, कॉँग्रेस उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे राष्टÑवादीला यंदा कशाच्या बळावर जागा सोडणार, असा प्रश्न कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस