पाटणेत घराचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 02:23 IST2020-07-24T02:23:32+5:302020-07-24T02:23:52+5:30

पाटणे येथील सावता महाराज मंदिर चौकातील नथाजी रामचंद्र खैरनार यांच्या राहात्या घराचे छत आज गुरुवारी दुपारी अडीच वाजता अचानक कोसळल्याने एकच घबराट निर्माण झाली. घरातील सात जण आवाज ऐकून घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

The roof of a house collapsed in Patna | पाटणेत घराचे छत कोसळले

पाटणेत घराचे छत कोसळले

ठळक मुद्देजीवितहानी नाही : ९० हजारांचे नुकसान

पाटणे : येथील सावता महाराज मंदिर चौकातील नथाजी रामचंद्र खैरनार यांच्या राहात्या घराचे छत आज गुरुवारी दुपारी अडीच वाजता अचानक कोसळल्याने एकच घबराट निर्माण झाली. घरातील सात जण आवाज ऐकून घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. खैरनार कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
घटनेच्या वेळी नथाजी खैरनार पत्नी, मुलगा अनिल खैरनार, त्याची पत्नी, ७ वर्ष, १२ वर्ष आणि १८वर्ष वयाच्या तिन्ही मुली अशा सात व्यक्ती घरातच असल्याने संकटात सापडले होते. थोड्याशा आवाजाने घराबाहेर पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत घरातील पंखा ,टीव्ही, कपाट, पलंग, सोपा आदी वस्तूंचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: The roof of a house collapsed in Patna