शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

राज ठाकरेंची भूमिका कोणाच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:22 IST

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देराजकीय भूमिका गुलदस्त्यातच

नाशिक : २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांंकाची मत, नाशिक महापालिकेत तब्बल ४० नगरसेवक निवडून आणण्याची साधलेली किमया आणि १० वर्षांपूर्वी शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ काबीज करणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मात्र लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आघाडीसह अन्य पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरणार असल्याने ठाकरे यांनी घेतलेली भाजपाविरोधी भूमिका नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या निवडणुकीत युती, आघाडीसह माकपा, भाकपा, बहुजन वंचित आघाडी, बसपा, सपा, आम आदमी पार्टीनेही उमेदवार रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. मंगळवारी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ‘मोदी-शहा यांना दूर सारा’, असा संदेश दिला. परंतु राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली.भाजपाचा पराभव करा असे सांगत असताना कोणाला मतदान करायचे हे मात्र त्यांनी जाहीर केले नाही. त्यामुळे मनसेच्या मतांविषयी जो तो आपल्या परीने अर्थ लावण्यास मोकळा झाला आहे. नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला होता.मात्र कालांतराने मनसेत मोठी पडझड होऊन विधानसभा, महापालिका निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी भाजपा विरोध दर्शविताना नेमकी मदत कुणाला करावी, याविषयी भूमिका स्पष्ट न केल्याने मनसैनिक संभ्रमात पडले आहेत. तरीही ठाकरे यांनी राजकीय फटाके फोडण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त अजून शिल्लक ठेवल्याने तोपर्यंत मनसैनिकांसह भाजपाविरोधी पक्षांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही हे यापूर्वीच राज ठाकरे यांनी जाहीर केले होते, परंतु ते कोणाला मदत करतात याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. मध्यंतरी त्यांची राष्टÑवादीच्या नेत्यांशी झालेली जवळीकता पाहता, ठाकरे हे राष्टÑवादीच्या उमेदवारांना मदत करतील, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेकडे साºया पक्षांचे लक्ष लागून होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे