रोहित यादव, सुशीला चौधरी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:18 IST2020-02-01T22:18:18+5:302020-02-02T00:18:11+5:30
सिन्नर अॅथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन-२०२० स्पर्धा शुक्रवारी पार पडली.

सिन्नर येथे आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये धावताना स्पर्धक.
सिन्नर : सिन्नर अॅथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन-२०२० स्पर्धा शुक्रवारी पार पडली. आडवा फाटा येथून सकाळी ७ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात झाली.
मॅरेथॉनमध्ये एकूण ७०० स्पर्धकांनी भाग घेतला. यात भागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आदिवासी व दुर्गम भागातील धावपटूंनी हौशीने सहभाग नोंदविला. धुळे, जळगाव, नंदुरबार येथील स्पर्धकही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य हणजे एक रेस मूकबधिर पाल्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. अगदी आठ वर्षांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे बाबा जल्लोषात धावले. हरिभाऊ ढोली या ऐंशीवर्षीय बाबांनी पाचवा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा विविध गटात घेण्यात आली. स्पर्धेचा समारोप सचिव बाळासाहेब लोंढे यांनी केला.
प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकांची नावे
पुरुष (खुला गट) -
रोहित यादव, दिनकर महाले, हिरामण महाले, उदयसिंह पाडवी, श्याम वाघ.
महिला (खुला गट)- सुशीला चौधरी, वनिता भोंबे, सरस्वती चौधरी, अश्विनी कटोळे, माधुरी काळे.