देशमानेच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:04 IST2018-09-30T00:04:04+5:302018-09-30T00:04:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील देशमाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने विद्यमान उपसरपंच भारत बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी अनेकजण इच्छुक होते.

देशमानेच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे बिनविरोध
सिन्नर : तालुक्यातील देशमाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तन पद्धतीने विद्यमान उपसरपंच भारत बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याचवेळी सरपंच- उपसरपंचपदाचे आवर्तन व उमेदवार कोण हे ठरले होते. मात्र दरम्यानच्या काळात सदस्यांमध्ये एकमत न राहिल्याने उपसरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली. सरपंच विमलबाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंच-पदासाठी गोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंखे यांनी गोरे यांची बिनविरोध निवड घोषित केली.