विंचूरला दरोडा; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 01:18 AM2021-01-11T01:18:33+5:302021-01-11T01:18:52+5:30

निफाड तालुक्यातील विंचूर जवळील भरवस फाटा येथे शेतकऱ्याच्या घरावर पडलेल्या दरोड्यात एक ठार, तर महिला जखमी झाल्याची घटना घडली. 

Robbery at Vinchur; One killed | विंचूरला दरोडा; एक ठार

विंचूरला दरोडा; एक ठार

googlenewsNext

विंचूर : निफाड तालुक्यातील विंचूर जवळील भरवस फाटा येथे शेतकऱ्याच्या घरावर पडलेल्या दरोड्यात एक ठार, तर महिला जखमी झाल्याची घटना घडली. 
 कारभारी आबाजी जगताप हे ह्या दरोड्यात ठार झाले असून त्यांच्या पत्नी अलका जगताप ह्या गंभीर जखमी झाल्या.  सदर जोडपे येवला रस्त्यालगत असलेल्या शेतातील घरात राहत होते. त्यांचा मुलगा दीपक बाजूच्या शेतात वास्तव्याला आहे. मध्यरात्री अडीच-तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला. शेजारील कारभारी जगताप यांच्याकडे गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले  दिसून आले.  डोक्यात जखम होऊन कानामागून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  घटनेचे गांभीर्य ओळखून यांनी मुलगा दीपक यास माहिती दिली.  या घटनेतील जखमी अलका जगताप यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या जबाबानंतर घटनेचा उलगडा होणार आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घरातील सामान अस्ताव्यस्त करण्यात आले होते.

Web Title: Robbery at Vinchur; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.