अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी, पालकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:56+5:302021-06-23T04:10:56+5:30
नाशिक : छात्रभारती विद्यार्थ्यांची संघटनेतर्फे शहरी विभागातील सर्व महाविद्यालये बेकायदेशीररीत्या अतिरिक्त फीच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची लूट करत ...

अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली विद्यार्थी, पालकांची लूट
नाशिक : छात्रभारती विद्यार्थ्यांची संघटनेतर्फे शहरी विभागातील सर्व महाविद्यालये बेकायदेशीररीत्या अतिरिक्त फीच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांची लूट करत असल्याचा आरोप करून शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थी व पालकांकडून कोरोना लाॅकडाऊन काळात अवाजवी फी आकारली जात असून शिक्षणाचा बाजार मांडत शिक्षण संस्थाचालकाची अरेरावी सुरू असल्याचे छात्रभारतीने या निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच लाॅकडाऊन काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असताना इतर शुल्काच्या नावाखाली अतिरिक्त फी कशाला घेता, असा सवालही छात्रभारतीने उपस्थित केला आहे.
ऑनलाइन शिक्षणाची गुणवत्ता आणि तिच्यावर नियंत्रण किती व कसे आहे, याची कुठलीही स्पष्टता दिसून येत नाही. मग ज्या सुविधा विद्यार्थ्यांनी उपभोगल्या नाहीत तर त्या सुविधेची फी का भरायची, असा प्रश्न छात्रभारतीने केला आहे. यावेळी छात्रभारतीच्या शिष्टमंडळात राज्याचे उपाध्यक्ष राकेश पवार, राज्य संघटक समाधान बागूल, शहराध्यक्ष देवीदास हजारे, आम्रपाली वाकळे, अपूर्वा मोगलाईकर, आशिष कळमकर, शुभम ढेरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
220621\22nsk_14_22062021_13.jpg
===Caption===
अतिरिक्त शुल्काच्या मुद्द्यावर शिक्षण उपसंचालक नितिन उपासणी यांच्याशी चर्चा करताना छात्रभारतीचे राकेश पवार,समाधान बागुल, देविदास हजारे, आम्रपाली वाकळे, अपुर्वा मोगलाईकर, आशिष कळमकर, शुभम ढेरे आदी