चांदवडला ऐन दिवाळीत जबरी लुटमार करणारे दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरगांबाद येथून ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:15 IST2020-02-20T16:12:55+5:302020-02-20T16:15:43+5:30
चांदवड - येथे दिवाळीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.

चांदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी जबरी चोरी करणारे चार जणांना स्थानिकगुन्हे शाखेचे पथकांनेताब्यात घेतले यावेळी पोलीस निरीक्षक अशोक करपे, राम कर्पे, अरुण पगारे, संजय गोसावी,सुशांत मरकड,मंगेश गोसावी, रविंद्र टर्ले, हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम व पथकांतील कर्मचारी.
चांदवड - येथे दिवाळीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.
दिवाळीत शेळके वस्ती परिसरातील शेतकरी समाधान पुंजाराम शेळके यांच्या घरातून दागीने जबरीने हिसकावुन घेतले तर डावखरनगर मधील कृष्णा लक्ष्मण पवार यांचे घरातही सदर चोरट्यांनी प्रवेश करुन त्यांचे पत्नीस चाकुचा धाक दाखवुन सोन्याचे दागिणे लुटमार करुन नेले होते. या दोन्ही घटनाबाबत चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
अहमदनगर जिल्हयात श्रीरामपुर तालुक्यातील गणेशनगर परिसरातील संशयीताची माहिती घेतली असता ते औरगांबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नवगाव परिसरात सापळा रचुन शुभम अनिल काळे (२१)गणेशनगर अहमदनगर, विकास ज्ञानेश्वर पवार (२३)रा. ब्राम्हणगाव वेताळ ता. श्रीरामपुर ,अहमदनगर ,भरत तात्याजी काळे , राहुल अनिल काळे रा. गणेशनगर श्रीरामपुर यांनी गेल्या दोन महिन्यापुर्वी भाऊबीजेच्या दुसºया दिवशी चांदवड शहरातील दोन घरामध्ये जबरी चोरीची कबली दिली.
यावेळी ताब्यात घेतलेले शुभम काळे व विकास पवार हे पैठण तालुक्यातील नवगाव परिसरात राहणारा गुन्हेगार संजय रावसाहेब चव्हाण (३२)रा. तुळजापूर ता. पैठण जि. औरगांबाद यांचे कडे काही दिवसापासून वास्तवास होते. संजय चव्हाण हा सन २००६ पासून सिन्नर पोलीस ठाण्यामधील घरफोडीचे व चोरीचे गुन्हयात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. तसेच विकास व शुभम हे सध्या बनावट नंबर प्लेट लावून वापरत असलेली बजाज पल्सर मोटार सायकल ही धुळे शहर पोलीस ठाण्याकडील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले.