Robbery at ATM center for the second consecutive day | सलग दुसऱ्या दिवशी एटीएम केंद्रावर दरोडा
सलग दुसऱ्या दिवशी एटीएम केंद्रावर दरोडा

ठळक मुद्दे३२ लाख लंपास : सलग दोन घटना; चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

मातोरी : शहरामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर चक्क गॅसकटरच हातात घेत शहरातील एटीएम केंद्रे ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. नाशिकरोडनंतर मखमलाबाद गावातही चोरट्यांनी अशाच प्रकारे भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम गॅसकटरने कापून पहाटेच्या सुमारास ३१ लाख ७५ हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी ही घटनादेखील बुधवारी पहाटेच्याच सुमारे घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. एटीएमचे शटर खाली असल्यामुळे गुरुवारी सदर प्रकार उघडकीस आला.
शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून चोरट्यांनी स्टेट बॅँकेचे एटीएम केंद्र लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दोन घटनांमध्ये सुमारे ४५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांच्या टोळीने लांबविला आहे. जेलरोडचे एटीएम गॅस कटरने कापून सुमारे १३ लाख रुपये लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.
अस्पष्ट फुटेज
४सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असली तरी कॅमेरा खूप अंतरावर असल्याने आणि रात्रीची वेळ असल्यामुळे फुटेज फारसे स्पष्ट आले नाही. वाहनाचा प्रकारही या चित्रीकरणातून पुढे येत नाही. त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणाचा तपासासाठी कितपत उपयोग होईल? याबाबत संभ्रमावस्था आहे.


Web Title: Robbery at ATM center for the second consecutive day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.