शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भरदिवसा नाशिक शहरात सराफाच्या दुकानावर दरोडा; ३० तोळे सोने लुटून पोबारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:47 IST

दुपारी २वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ न्हवती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. दोघे दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता. 

नरेंद्र दंडगव्हाळ -

नाशिक : येथील सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या 'श्री ज्वेलर्स' या दुकानात दोन तरुण दरोडेखोर सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले. दुकानात असलेल्या दाम्पत्यावर पिस्तूल रोखून धरले. दुकानातील मांडण्यमध्ये असलेले सर्व सोन्याचे दागिने गोणीत भरून कॉलनी रस्त्याने पळ काढत पुढे दुचाकीने पसार झाले.

दुपारी २वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ न्हवती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. दोघे दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता. दुकान मालक दीपक घोडके व त्यांची पत्नी मनीषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील 30 तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केले. यावेळी त्यांनी मराठीतुन आपआपसांत संवाद साधला, असे मनीषा घोडके यांनी सांगितले. हे दोघे परिसरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसGoldसोनं