शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

कसारा घाटात ट्रकचालकाला लुटणाऱ्या दरोडेखोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 02:51 IST

कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रक चालकास शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्ध्या तासाच्या थरारनाट्यानंतर एकास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.  

ठळक मुद्देथरारनाट्य : एक पोलीस कर्मचारी जखमी; दोन जण फरार

इगतपुरी : कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रक चालकास शुक्रवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अर्ध्या तासाच्या थरारनाट्यानंतर एकास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.       नाशिकहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एम एच ४० बीजी ६१६५) हा रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाट उतरत असताना  गाडीचा पाटा तुटला. त्यामुळे महामार्ग पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी सदर ट्रक  रस्त्याच्या बाजूला  लावून  ठेवण्यात आला.  रात्रीच्या वेळी गॅरेज उपलब्ध होत असल्याने  ट्रक चालकास महामार्ग पोलिसांनी मोबाइल नंबर दिला व पोलीसगस्तीसाठी निघून गेले.पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास ट्रकजवळ   मोटारसायकलवरून तिघे जण आले.  पूर्ण काळे कपडे परिधान केलेल्या या ३ तरुणांनी गाडीतील चालकास आवाज देत उठवले व दादागिरी करीत ट्रकवर दगडफेक केली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखीत महामार्ग पोलिसांना फोन केला.  तोपर्यंत या ३ तरुणांनी ट्रकमध्ये चढून ट्रक चालक विकी खोब्रागडे व क्लीनर निधी वासनिक यांना बेदम मारहाण केली व  त्यांच्या कडील रोख रक्कम व मोबाइल हिसकावून घेतला.  त्याचदरम्यान महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे  माधव पवार, मुरलीधर गायकवाड, दीपक दिंडे व संजय नंदन हे तिथे पोहोचले.  पोलीस आल्याचे समजताच लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करीत जंगलात पळ काढला. याचदरम्यान तिघांपैकी   मुख्य सूत्रधार असलेल्या विजय रामदास ढमाळे, रा. इगतपुरी याला  पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करीत पकडले.  पोलीस हवालदार मुरलीधर गायकवाड यांनी त्याला पकडून ठेवल्याने दरोडेखोर  विजय ढमाळे याने पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला चढविला.  त्यात ते जखमी झाले.   त्याचदरम्यान अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करीत ताब्यात घेतले व कसारा पोलिसांच्या हवाली केले. आरोपीकडे असलेली दुचाकी (क्रमांक एमएच १५ एचबी १०७५) देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.पोलीस पोलिसांच्या मदतीसाठी...दरम्यान, कसारा घाटात धारदार शस्त्र घेऊन लुटमार करणारी टोळी वाहनचालकांना दादागिरी व मारहाण करीत असून  महामार्ग  पोलिसांवरसुद्धा दगडफेक करीत असल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलमान खतीब व  पोलीस कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्यदेखील मदतीला पोहोचले; परंतु तोपर्यंत दोघे जण पळून गेले होते, तर एका आरोपीस महामार्ग पोलिसांनी पकडून ठेवले होते. पहाटेच्या अंधारात घडलेल्या अर्धा तासाच्या या थरार नाट्यात शस्त्रधारी दरोडेखोरांशी दोन हात करणाऱ्या महामार्ग पोलीस व कसारा पोलिसांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी