रस्ते व विविध प्रश्नी गांधीगिरी करीत खड्यात वृक्षारोपण , रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:36 IST2018-09-03T18:34:53+5:302018-09-03T18:36:23+5:30
चांदवड : चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटी व राष्टÑवादी कॉँग्रेस , समता परिषदेच्या वतीने सोमवारी बसस्टॅन्ड समोर चांदवड मनमाडरोडवर चांदवड तालुक्यातील शेती प्रश्न, शेतीमालाचे बाजारभाव, वाहतुकीचे रस्ते इ. प्रलंबित प्रश्नांसंदर्भात रस्त्यावरील खड्यामध्ये वृक्षारोपण करीत गांधी मार्गाने आंदोलन करीत काही काळ रास्ता रोको आंदोलन छेडले.

रस्ते व विविध प्रश्नी गांधीगिरी करीत खड्यात वृक्षारोपण , रास्तारोको
चांदवड : चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटी व राष्टÑवादी कॉँग्रेस , समता परिषदेच्या वतीने सोमवारी बसस्टॅन्ड समोर चांदवड मनमाडरोडवर चांदवड तालुक्यातील शेती प्रश्न, शेतीमालाचे बाजारभाव, वाहतुकीचे रस्ते इ. प्रलंबित प्रश्नांसंदर्भात रस्त्यावरील खड्यामध्ये वृक्षारोपण करीत गांधी मार्गाने आंदोलन करीत काही काळ रास्ता रोको आंदोलन छेडले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, चांदवड तालुका कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार ,समता परिषदेचे रघुनाथ अहेर,शिवाजी कासव, उत्तम ठोंबरे, विजय कुंभार्डे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड , शंकरराव गांगुर्डे, अशोक शिंदे , शंकरराव गांगुर्डे, शिवाजी बर्डे, बापु शिंदे, राजु गिडगे, राहुल कोतवाल आदिनी आंदोलन केले.