दुशिंगपूरला लोकवर्गणीतून साकारले रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST2021-07-26T04:13:41+5:302021-07-26T04:13:41+5:30

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा होती. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे मोठी गैरसोय होते. दुचाकी, ...

Road work carried out by the people in Dushingpur | दुशिंगपूरला लोकवर्गणीतून साकारले रस्त्याचे काम

दुशिंगपूरला लोकवर्गणीतून साकारले रस्त्याचे काम

अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा होती. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे मोठी गैरसोय होते. दुचाकी, चारचाकी वाहने नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. परिसरातील ग्रामस्थांचे दळणवळणाचे साधन असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत रस्ता दुरुस्त करण्याचे ठरवले. गावातील युवकांच्या मदतीने दगड व मुरमाचा थर देऊन पाण्याचा वापर करून हा रस्ता मजबूत करण्यात आला. अमोल ढमाले, प्रकाश ढमाले यांनी रस्त्याच्या कामासाठी जेसीबी मशीन उपलब्ध करून दिल्याने कामास गती आली.

ग्रामस्थांच्या वतीने अशोक ढमाले, कचरू घोटेकर, संदीप घेगडमल, कानिफनाथ ढमाले, निवृत्ती ढमाले, सोपान ढमाले, गोपीनाथ ढमाले, दिलीप ढमाले, प्रदीप ढमाले, विष्णू शिंदे, सूर्यभान घोटेकर, महेंद्र दिघे, सोमनाथ शिंदे, दिगंबर दिघे, गोरख गोराणे, योगेश ढमाले, दीपक गोराणे आदींनी परिश्रम घेतले. दत्तमंदिर ते दिघे वस्ती पुढे रानमळापर्यंत जाणारा हा रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठी डोकेदुखी ठरला होता. पावसाळ्यात चिखल तुडवीत मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून रस्ता बनवून आदर्श घालून दिला आहे. कामासाठी युवकांचे मोठे सहकार्य लाभले.

फोटो ओळी : २५ सिन्नर रस्ता

दुशिंगवाडी येथील ग्रामस्थांनी युवकांच्या मदतीने लोकवर्गणीतून सुरू केलेले दत्तमंदिर ते दिघे वस्ती रस्ता दुरुस्तीचे काम.

250721\25nsk_41_25072021_13.jpg

दुशिंगवाडी येथील ग्रामस्थांनी युवकांच्या मदतीने लोकवर्गणीतून सुरु केलेले  दत्त मंदिर ते दिघे वस्ती रस्ता दुरु स्तीचे काम.

Web Title: Road work carried out by the people in Dushingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.