रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आज वॉकेथॉन
By Admin | Updated: January 18, 2015 01:12 IST2015-01-18T01:12:04+5:302015-01-18T01:12:34+5:30
रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आज वॉकेथॉन

रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आज वॉकेथॉन
नाशिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या २६व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त रविवारी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे़ या वॉकेथॉनला सकाळी आठ वाजता डोंगरे वसतिगृहापासून सुरुवात होणार असून, विद्याविकास सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर व पुन्हा डोंगरे वसतिगृह असा त्याचा मार्ग आहे़ यामध्ये आमदार सीमा हिरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत़ दरम्यान, यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सतीश मंडोरा यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)