शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रस्ता सुरक्षा सप्ताह : भरधाव कारची दोन मोटारींसह दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:50 IST

दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अ‍ॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अ‍ॅक्टीवाला जोरदार धडक दिली.

ठळक मुद्देसचिन शिवाजी पवार (३०, रा.जेलरोड) हा अपघातात गंभीर दुचाकीचे दोन तुकडे, मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक : रविशंकर मार्गावरून वडाळागावाकडून पुणे महामार्गाकडे भरधाव जाणाऱ्या इरटिगा मोटारीने दुचाकीस्वारासह रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन मोटारींना जोरदार धडक दिली. या कारचा वेग इतका प्रचंड होता की, मोटारींना धडक देऊनही कार थांबली नाही तर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या नाल्याच्या कथड्यावर चढली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन गंभीर जखमी झाल्याचे समजते.याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अ‍ॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अ‍ॅक्टीवाला जोरदार धडक दिली. या धडकेत अ‍ॅक्टीवावरील राकेश दूर अंतरावर फेकला गेला तर दुचाकीचे दोन तुकडे होऊन  चाक लांब अंतरापर्यंत निखळून पडले. अपघातग्रस्त इरटिगा कारवर तरी चालकाला नियंत्रण मिळविता आले नाही. परिणामी स्विफ्ट डिझायर कार (एम.एच१५ एफव्ही ५८९५), टाटा इंडिका (एम.एच०३ एएम ५१५९) या दोन्ही मोटारींना जोरदार धडक दिली. सुदैवाने या मोटारी रस्त्यालगत उभ्या असल्याने मोठा अनर्थ टळला. इरटिगामध्ये पाठीमागील बाजूस झोपेत असलेला सचिन शिवाजी पवार (३०, रा.जेलरोड) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नव्हती. या विचीत्र अपघातात मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातNashikनाशिक