मनमाड आगारात रस्ता सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:13 IST2020-01-13T22:36:18+5:302020-01-14T01:13:32+5:30
मनमाड बस आगारात रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन पो.नि. राजेंद्र कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापक प्रितम लाडवंजारी,राकेश सोनवणे आदी उपस्थित होते.

मनमाड आगारात सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पो.नि. राजेंद्र कुटे,प्रितम लाडवंजारी,राकेश सोनवणे आदी़
मनमाड : मनमाड बस आगारात रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहाचे उद्घाटन पो.नि. राजेंद्र कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून आगार व्यवस्थापक प्रितम लाडवंजारी,राकेश सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.मनमाड आगाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आगार व्यवस्थापक लाडवंजारी यांनी प्रास्ताविकातून सुरक्षा सप्ताहा अंतर्गत आयोजीत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहीती दिली.पो.नि. कुटे यांनी सुरक्षीत वहातूकी संदर्भात चालकांना मार्गदर्शन केले.या वेळी के.के. सोनवणे,नागू मोरे,गौरव शिरोळे,राजू इपर,ए.आर. गायकवाड यांच्यासह आगारातील चालक, वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.