इगतपुरी येथे रस्ता सुरक्षा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:14+5:302021-02-05T05:47:14+5:30

मोटरवाहन अपघातास आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रसार व प्रचार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी देशभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा ...

Road safety campaign at Igatpuri | इगतपुरी येथे रस्ता सुरक्षा अभियान

इगतपुरी येथे रस्ता सुरक्षा अभियान

मोटरवाहन अपघातास आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रसार व प्रचार व्हावा, या उद्देशाने दरवर्षी देशभरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असते.

यावेळी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण, अपघातातील जखमींचा जीव वाचविणे, तातडीने उपचार करणे, तसेच १०८ क्रमांकाच्या वैद्यकीयसेवेचा वापर करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आग लागली, तर ती कशी आटोक्यात आणावी व त्यासाठी काेणती खबरदारी घ्यावी, प्रथमोपचार व मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

याप्रसंगी महामार्ग पोलीस घोटी टॅबचे कर्मचारी, महिंद्रा कंपनीचे अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर हरीश चौबे, फायरमन मनोज भडांगे, महाविद्यालयाचे शिक्षक हेमंत जोशी, राहुल पंडित, सचिन उघडे, शिक्षिका उज्ज्वला करवा, पुष्पलता सुर्वे, हरदे, सोनवणे, पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

===Photopath===

010221\01nsk_1_01022021_13.jpg

===Caption===

इगतपुरी येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी व अग्नीशमन दलाचे अधिकारी.

Web Title: Road safety campaign at Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.