पावसामुळे वाहून गेलेला रस्ता चार दिवसांत दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST2020-06-19T21:23:41+5:302020-06-20T00:23:10+5:30
दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९५३चे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सप्तशृंगगडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पांडाणे येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला पर्यायी रस्ता चौथ्या दिवशी वाहतूक सुरळीत करण्यात आला.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ९५३चे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सप्तशृंगगडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला. चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वणी, बोरगाव, सापुतारा, वघई, वासदा, सुरत रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, भीतबारी ते धनाई मातावणीपर्यंत रस्त्याचे कुठे एकेरी, तर कुठे दोन्ही बाजू वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. दोन ठिकाणी पुलाचे काम सुरू असताना रविवारी (दि.१४) सायंकाळी सप्तशृंगगडावर व अहिवंतवाडी गड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पांडाणे येथील पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी केलेला मातीचा रस्ता वाहून गेल्यामुळे गुजरात व महाराष्ट्र अशा दोन राज्याचा संपर्क तुटला. बातमी पसरताच विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार पंकज पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता मनोज पाटील यांनी पुलाची पाहणी करून कच्चा रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. चार दिवसांनंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.