पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर दुभाजक टाकण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST2021-05-24T04:13:44+5:302021-05-24T04:13:44+5:30

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्वामी समर्थनगर, दामोदरनगर, ज्ञानेश्वरनगरसह विविध उपनगरे आहेत. देवळाली कॅम्प, वडनेर गेट ...

The road from Pathardi fork to Pathardi village began to have dividers | पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर दुभाजक टाकण्यास सुरुवात

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर दुभाजक टाकण्यास सुरुवात

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत स्वामी समर्थनगर, दामोदरनगर, ज्ञानेश्वरनगरसह विविध उपनगरे आहेत. देवळाली कॅम्प, वडनेर गेट पाथर्डी गावातील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे दुभाजकाची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, दुभाजक नसल्यामुळे या मार्गावर लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले होते. अनेक दिवसांपासून पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर दुभाजक टाकण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन दुभाजक टाकण्याच्या कामास सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या रस्त्यावर आठ महिन्यांपूर्वी अपघात होऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी महापालिका सभागृह नेते सतीश सोनवणे आले असता प्रभागाचे नगरसेवक भगवान दोंदे व नगरसेवक सुदाम डेमसे यांनी दुभाजक टाकण्याची मागणी केली होती. सोनवणे यांनी निधी मंजूर केला होता.

Web Title: The road from Pathardi fork to Pathardi village began to have dividers