निऱ्हाळे ते निमोण रस्ता बनला अपघातप्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:18+5:302021-09-26T04:15:18+5:30
निऱ्हाळे : संगमनेर व सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा निऱ्हाळे ते निमोण हा रस्ता संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातप्रवण बनला ...

निऱ्हाळे ते निमोण रस्ता बनला अपघातप्रवण
निऱ्हाळे : संगमनेर व सिन्नर या दोन तालुक्यांना जोडणारा निऱ्हाळे ते निमोण हा रस्ता संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातप्रवण बनला आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरून गेले आहे. त्यामुळे या मार्गांवर अपघात सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती काही दिवसांत न केल्यास रस्त्यांवरील खड्ड्यांत वृक्षलागवड करण्याचा इशारा परिसरातील प्रवासीवर्गाने दिला आहे.
दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. निऱ्हाळेपासूनचा दोन किलोमीटरचा रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून खराब आहे. त्याचे दुरुस्तीचे काम केले नाही. त्यामुळे रस्त्यावर खडी उघडी पडली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. निमोणपासून दोन किलोमीटर रस्त्याचे काम डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, घुगे आखाडा ते निऱ्हाळे शिव असा एक किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहने रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांत चिखलाने अडकून पडतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांना काटेरी झुडपांच्या फांद्या डोळ्याला लागून अपघात होत आहेत. रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. असा हा रस्ता महत्त्वाचा असून केवळ संबंधित बांधकाम विभागाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कित्येक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी आहे. रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवाजी सांगळे, विलास वाघ, भिकाजी सांगळे, देविदास वाघ, बाळासाहेब सांगळे, वाळिबा शिंगाडे, मच्छिंद्र सांगळे, जगू पेढेकर, रामदास सांगळे, सुरेश केकाने, ज्ञानेश्वर सांगळे, खंडू वाघ, बाळासाहेब दराडे, भगवान कातकाडे, गोटीराम सांगळे, सुभाष दराडे, सुरेश सांगळे, वाळिबा सांगळे, नितीन देवकर, एस.पी. सांगळे, राजेंद्र वाघ, सुरेश कातकाडे, साहेबराव केकाने, बाळासाहेब केकाने आदी नागरिकांनी केली आहे.
----------------------
निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य. (२५ निऱ्हाळे)
250921\25nsk_9_25092021_13.jpg
२५ निऱ्हाळे