शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

मानेनगरवासीयांना रस्त्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:29 IST

महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे.

पंचवटी : महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे. मनपाच्या हद्दीत राहून कर अदा केल्यानंतरही मानेनगरवासीयांना रस्ते, ड्रेनेज यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने प्रशासनाचेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  तब्बल १५ वर्षांपासून या भागात रहिवासी वस्ती आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कॉलनीचा विस्तार झाल्याने दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून मानेनगरची ओळख आहे. मानेनगरमध्ये शिवपुष्प, रघुवीर, सुशीलनगरी, कपालेश्वरनगर, रामगडिया, नारायणनगर परिसरांचा समावेश होतो. नागरी वसाहतीत रस्ते असले तरी अद्यापही खडीकरण, डांबरीकरण झाले नाही परिणामी खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. प्रभागात महापालिकेने अनेक भूखंड आरक्षित केलेले असले तरी त्या भूखंडावर उद्यान, सभागृह, व्यायामशाळा नाही.  ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जमण्यासाठी मंदिरात यावे लागते. लोकवस्ती लक्षात घेता लहान मुलांसाठी उद्यान, वाचनालय, अभ्यासिका गरजेची आहे, मात्र प्रशासनाकडून या कामासाठी सध्यातरी कोणतीही तरतूद नाही. मानेनगर वसाहतीत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने शहरात राहून खेडेगावात राहात असल्याचा अनुभव येतो, असे नागरिकांनी सांगितले.मुख्य रस्त्यापासून पायपीटमानेनगरला नववसाहतीत शिक्षकवृंद, एचएएल कामगार, शासकीय कर्मचारी राहतात. अनेकांना शहरात बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. मानेनगरकडे येताना रस्ता व्यवस्थित नसल्याने बस, रिक्षा येत नाही त्यामुळे चाकरमाने, शालेय विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते. पावसाळ्यात तर स्कूल व्हॅन चिखलात फसत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा