Road encroachment removed from the community | लोकवर्गणीतून काढले रस्त्यावरील अतिक्रमण
लोकवर्गणीतून काढले रस्त्यावरील अतिक्रमण

देवळा : तालुक्यातील देऊळवाडी येथील शिवारात वाहतुकीला अडथळा होत असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्र मण शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून काढण्यात आल्यामुळे हया रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
देऊळवाडी ते खुंटेवाडी हया दोन कि.मी. अंतराच्या शिवार पांदीचे सहा वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनंतर आमदारिनधितून डांबरीकरण करण्यात आले होते. यामुळे हया परीसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरीकांची चांगली सोय झाली होती. या भागातील शेतकर्यांना आपल्या शेतमालाची वाहतुक करणे सुकर झाले. कालांतराने हया रस्त्याच्या दुतर्फा झुडपे, व काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्यांचे रस्त्यावर अतिक्र मण झाले व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. समोरासमोर आलेली दोन वाहने एकमेकांना ओलाडून जाण्यात असुविधा होऊ लागली. यामुळे ह्या रस्त्यावर छोटे मोठे अपघात अनेक वेळा झाले आहेत. मिलिंद निकम याच्या दुचाकीची समोरून येणार्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला व त्यात निकम जखमी झाले होते. अखेर हया परीसरात राहणारे शांताराम निकम, प्रभाकर निकम मिलिंद निकम, साहेबराव निकम, संजय निकम, दिपक निकम, भगवान निकम, दादा पाटील आदी शेतकर्यांनी एकत्र येऊन वाहतुकीला अडथळा होत असलेली झुडपे, व काटेरी झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून व लोकवर्गणीतून या दोन कि.मी. च्या शिवार पांदीवरील झाडाझुडपांचे जेसीबीच्या सहाय्याने सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे ह्या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.


Web Title:  Road encroachment removed from the community
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.