शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अंधारल्या वाटेवर, उजेड थोडा पेरूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:12 IST

अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टिदिन असेही म्हटले जाते.

ठळक मुद्देनॅबचे प्रेरणादायी कार्य : अंध बांधवांना जगण्याची उमेद देण्याचा प्रयत्नं

नाशिक : अंधत्व ही भारतातील प्रमुख समस्या असून, सुमारे ५५ लाख बांधव दृष्टिहीन आहेत. अशा अंध बांधवांना गतिशील राहण्यासाठी मार्गदर्शक असलेले मुख्य साधन म्हणजे पांढरी काठी होय. १५ आॅक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याला जागतिक दृष्टिदिन असेही म्हटले जाते.अंधत्व निवारण्यासाठी काही दूरगामी उपाय करणे आवश्यक असतानाच जे अंध बांधव आहे, त्यासाठी सेवा भावी कार्य मोठ्या प्रमाणावर होण्याची गरज आहे. नाशिकमधील नॅबसारख्या काही सामाजिक संस्थांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.आपल्या डोळ्यात बारीकसा केस किंवा धुलीकण गेला तरी आपण रडवले होतो. परंतु जेथे जन्मापासूनच दृष्टी नाही? त्यांच्या जीवनातील अंध:काराची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. जीवनात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा डोळा हा अवयव नसतानाही सर्वसामान्य माणसाप्रमाणे किंबहुना त्यांच्याही पेक्षा अधिक जिद्दीने आलेल्या संकटावर मात करीत अनेक अंध मुले-मुली आणि अंध बांधव भगिनी यशाकडे वाटचाल करीत आहेत. त्यांना जगण्याची उमेद आणि नवे बळ देण्याचे कार्य करणाऱ्या त्यात दि नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र (नॅब) या संस्थेचे प्रेरणादायी कार्य सुरू आहे. कारण नॅब ही संस्था गेल्या साडेतीन दशकापासून महाराष्ट्रातील अंध बांधवांच्या जीवनात उजेड पेरण्याचे कार्य करीत आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय सातपूर औद्योगिक वसाहतीत असून, राज्यभरात १८ जिल्ह्यामध्ये शाखा आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यामध्ये अंधासाठी कार्य करणाºया सेवाभावी संस्थेलादेखील मदत देण्यात येते. संस्थेमार्फत अंध मुलीसाठी निवासी शाळा सुरू करण्यात आली असून, बहुविकलांग मुला-मुलांची शिक्षणाची येथे सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंध, अपंग मुलांसाठी ‘सेन्सरी गार्डन’ तयार करण्यात आले असून, या मुलांना शिकविण्यासाठी विशेष अध्यापन कॉलेजची सुविधा आहे. यात डी.एड; बी.एड. कोर्सचा समावेश असून अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे शिक्षण घेऊन ‘विशेष’ मुलांसाठी सेवाभावी कार्य करण्यासाठी तयार होत आहेत, अशी माहिती नॅब युनिटचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दिली. अंध बांधवांच्या संस्थेच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन अनेकदा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.पांढरी काठीचा उपयोगपांढरी काठी हा अंध बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. पूर्वी साधी लाकडी काठी होती. परंतु सदर व्यक्ती अंध आहे हे सर्वांना समजावे म्हणून पांढरी काठीचा वापर सुरू झाला. त्यानंतर फोल्डिंगच्या काठ्या आल्या. आता ‘स्मार्ट टेन’ म्हणजे सेन्सर असलेली काठी आली असून, त्याचे मूल्य तीन हजार रुपयांपर्यंत असल्याने सर्वच अंध बांधवांना अशी काठी घेणे शक्य होत नाही. मात्र कोणत्याही पांढºया काठीच्या सहाय्याने अंध व्यक्ती रस्त्यावरून सहजपणे विनाआधार चालू शकते.नको दयेचा आधार, हवा हक्काचा वावरअंध बांधवांना जगण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे कुणाच्या दयेवर जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये दिसून येते. म्हणून अनेक अंध बांधव समाजात नोकरी, व्यवसाय करताना तर दिसतातच त्याचबरोबर उच्च अधिकारी पदावरदेखील पोहचलेले आहे. अंध बांधवांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महापालिकेचा राखीव निधी आहे. परंतु तीदेखील खर्च करण्यात येत नाही अशी खंत अनेक अंध समाजबांधवांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविली.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक