नामपूर परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 19:08 IST2019-08-18T19:08:07+5:302019-08-18T19:08:34+5:30
परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

मालेगाव, नामपूर, साक्र ी, नंदुरबार प्रमुख राज्यमार्ग क्र . ८ वरील नामपूरच्या स्टेट बँकेसमोरील मार्गाची झालेली दुरवस्था.
नामपूर : परिसरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने सगळीकडे रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर चिखल झाल्याने दुचाकीस्वारांना गाडी चालविताना कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यांमुळे त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. नामपूर-मालेगाव रस्त्यावर एसबीआय बँकेसमोर प्रचंड मोठा खड्डा झाल्यामुळे नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सर्व कॉलेजचे विद्यार्थी त्याच रस्त्याने जातात, त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडण्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्त्यांची दुरु स्ती करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड बागलाण तालुका अध्यक्ष सचिन अहिरराव, अमोल पाटील, सागर सावंत, महेश बच्छाव, अक्षय पगार ललित आहिरे, चैतन्य आहिरे यांनी केली आहे. दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.