ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:57 IST2020-01-12T23:41:28+5:302020-01-13T00:57:00+5:30

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिहर गड प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

Road closure at historic Harihar fort | ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद

ऐतिहासिक हरिहर गडावर मुक्कामाचा मार्ग बंद

ठळक मुद्देसंवर्धनाचे पाऊल : सह्याद्री प्रतिष्ठानने मुख्य प्रवेश कमानीत बसविला आठ फुटी लाकडी दरवाजा

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षेवाडी गावाजवळ असलेल्या हरिहर गडाच्या मुख्य कमानीमध्ये दुर्ग-गड संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या नाशिक विभागाने सागवान लाकडी दरवाजा बसविला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (दि.१२) या हरिहर गड प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले. सूर्यास्तानंतर चोरट्या रस्त्याने मुक्कामासाठी गड चढणाºया हौशी हुल्लडबाजांची वाट आता दरवाजामुळे बंद होण्यास मदत होईल.
हरिहर गडाच्या पायथ्याचे गाव हर्षेवाडी आहे. या गडाची चढाई अत्यंत अवघड आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितीतीत गडाचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या भागात कुºहाडबंदी, चराईबंदीसह बेकायदेशीरपणे प्रवेश करत धूम्रपान, मद्यप्राशन करणे कायदेशीर गुन्हा ठरतो. वनविभागाने गड व वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी हर्षेवाडी गावकऱ्यांची संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीची पूर्वपरवानगी घेत प्रवेश शुल्क भरून सोबत वाटाड्या घेऊनच गडावर पर्यटकांनी जावे, असा नियम वनविभागाकडून करण्यात आला आहे. मात्र गाव झोपी गेल्यानंतर अनेकदा काही हौशी मंडळी गावकºयांची नजर चुकवून रात्रीच्या वेळी हा अवघड व धोकादायक गड चढण्याचा प्रताप करत मुक्काम करतात. सदर प्रकार वनविभाग व स्थानिक त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या निदर्शनास आला होता. हरिहर गडाच्या संवर्धनासाठी पुढे आलेल्या प्रतिष्ठानने मागील पाच महिन्यांपासून येथील मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीत लाकडी दरवाजा बसविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. प्रवेशद्वाराच्या लोकार्पणप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, हर्षेवाडीचे सरपंच नामदेव बुरंगे यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...म्हणून वनविभागाने दिला हिरवा कंदील
गडाच्या सुरक्षिततेसह नागरिक व सभोवतालच्या वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने हरिहर गडाचा दरवाजा बसविण्याबाबतचे पत्र उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांना दिले. यानंतर वनविभागाने यामुळे कुठल्याही प्रकारच्या वन कायद्याचा भंग तर होत नाही ना याबाबत खात्री पटविली. यानंतर वनविभाग प्रशासनाकडून गडावर दरवाजा बसविण्याकरिता हिरवा कंदील दाखविला. लोकवर्गणीतून प्रतिष्ठानने सागवान लाकडापासून तयार केलेला आठ फुटी दरवाजा गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीत बसविला आहे.

Web Title: Road closure at historic Harihar fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.