नाशिक : केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी कायदे, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, गरजु कुटुंबाला सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत द्यावे, कोरोनापासून सुटका करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करावी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक तालुका कमिटी, अखिल भारतीय किसान सभेने एल्गार पुकारला. गुरुवारी (दि.२६) लाल बावटे घेत शेतकरी, कामगार घटकातील आंदोलकांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता दुतर्फा रोखून धरला.भाजपा सरकारच्या शेतकरी-कामगारविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी रास्ता रोकोची हाक देण्यात आली होती. कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने पुकारलेल्या या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद लाभला. केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलकांनी महिरावणी गावाजवळील चौफुलीवर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास रास्ता रोको सुरु केला. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा आंदोलकांनी ठिय्या मांडल्यामुळे नाशिक-त्र्यंबक-नाशिक या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली. सुमारे तासभर आंदोलकांनी वाट अडवून जोरदार घोषणाबाजी केली. तासाभरानंतर पोलिसांनी मात्र आंदोलकांना त्वरित हटविण्यास सुरुवात करत वाहतूक सुरळीत केली.
शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 13:39 IST
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतुक सातपूरकडून गिरणारेमार्गे वळविण्यात आली होती. तसेच नाशिककडे येणारी वाहतुक त्र्यंबकरोडवरून पहिने-पेगलवाडीजवळून रोहिलेमार्गे रवाना करण्यात आली.
शेतकरी, कामगारांनी रोखला रस्ता; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर तासभर ठिय्या
ठळक मुद्देवाहतुक ठप्पवाट अडवून जोरदार घोषणाबाजी