निफाड तालुक्यातील नदयांना पुर

By Admin | Updated: September 21, 2015 22:44 IST2015-09-21T22:38:48+5:302015-09-21T22:44:52+5:30

आंनदोत्सव : खरीप गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत

Rivers of Niphad taluka | निफाड तालुक्यातील नदयांना पुर

निफाड तालुक्यातील नदयांना पुर

लासलगाव : शुक्र वारी झालेल्या पावसाने निफाड तालुक्यातील शेती व जनता सुखावली. तब्बल नऊ वर्षानंतर धुवाधार पर्जन्यराजामुळे सर्वच नदयांना आला पुर ...खरीप हंगाम गेला तरी रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
लासलगाव , निफाड , पिंपळगाव बसवंत, चांदोरी, सायखेडा, देवगाव, ओझर, नांदुरमध्यमेश्वर, चांदोरी, पालखेड व विंचुर महत्वाच्या गावांच्या परीसरात वरूणराजा धो..धो बरसला.आणी जुन,जुलै,आॅगस्ट व सप्टेंबर मिहन्यात अत्यंत तोकडा पडलेला पाऊस मनसोक्त बरसला.
निफाड तालुक्यातील पावसाचे सरासरी पर्जन्यमान आजवर 482 मि.मी.इतके आहे.तर दरवर्षी सप्टेंबर मिहन्यात सरासरी पावसाचे पर्जन्यमान 154.7 मि.मी.इतके आहे.मागील वर्षी सन 2014 मध्ये दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 437.6 मि.मी. पाऊस झाला अशी शासकीय आकडेवारी आहे.तर दि.19 सप्टेंबर 2015 रोजी 195.6 मि.मी.पाऊस झाला.त्यामुळे या वर्षी दि.7 जुन ते 19 सप्टेंबर पर्यंत निफाड तालुक्यात 343.8 मि.मी. पाऊस झाला.त्यामुळे 71 टक्के सरासरी पावसाची टक्के यावर्षी नोंद एकाच दिवसातील.पावसाने झाली.
तब्बल नऊ वर्षानंतर सळधार पर्जन्यराजामुळे नदी नाल्यांना पुर आला. लासलगाव. निफाड व पिंपळगाव बसवंत परीसरात पर्जन्यराजा मनसोक्त झाल्याने जवळपास दुकाने सर्वच गृहनिर्माण संस्थाच्या परीसरातील उंचसखल भागात पावसाचे पाणी घरात घुसुन संसारपयोगी साहीत्याचे व व्यापार्यांचे विक्र ी करावयाच्या मालाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वाहतुक ठप्प झाली असुनही आपत्कालीन व्यवस्थापन फोल ठरले आहे.याचा अनुभव शुक्र वारी तालुक्यातील जनतेला आला. (वार्ताहर)

Web Title: Rivers of Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.