वाढत्या डेंग्यू, मलेरिया रुग्णांमुळे अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST2021-08-20T04:18:57+5:302021-08-20T04:18:57+5:30
प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभागाची सभा घेण्यात आली. यावेळी अनेक विषयांवर लोकप्रतिनिधींनी संबंधित खातेप्रमुखांना चांगलेच धारेवर ...

वाढत्या डेंग्यू, मलेरिया रुग्णांमुळे अधिकारी धारेवर
प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर प्रभागाची सभा घेण्यात आली. यावेळी अनेक विषयांवर लोकप्रतिनिधींनी संबंधित खातेप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. पाण्याच्या पाइपलाइनमध्ये दारूच्या बाटल्या, दगड कसे सापडू शकतात, याबाबत नगरसेवक सलिम शेख यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. परिसरातील डेंग्यू, मलेरिया साथीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गवतावर तणनाशक मारण्याची मागणी सीमा निगळ, दीक्षा लोंढे यांनी केली. प्रभागांमध्ये वाढत्या अतिक्रमणावर सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. अधिकारी फोनच उचलत नसल्याने दीक्षा लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली. हेमलता कांडेकर यांनी विद्युत विभागाला धारेवर धरीत गुंठेवारीमध्ये विद्युत कामांची पूर्तता करण्यासाठी व त्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आग्रह धरला. प्रभागात चार नगरसेवक असताना एकालाच डावलून शुभारंभ कसा केला जातोे, असाही प्रश्न उपस्थित केला. सातपूर विभागातील, ड्रेनेज, बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, मनपाची रुग्णालये, प्रसूतीगृहे, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, अतिक्रमण, पाणीपुरवठा, अग्निशमन, पशुसंवर्धन, उद्यानविषयक कामाची चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक मधुकर जाधव, हर्षदा गायकर, राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे, स्वीकृत सदस्य दशरथ लोखंडे, विभागीय अधिकारी नितीन नेर आदींसह अधिकारी उपस्थित होते.