शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली,

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, परंतु पक्षाला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच त्यांचे निर्वाण झाले. त्यानंतर ३ आॅक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर वर्षभरातच हा पक्ष फुटला आणि फाटाफुटीची बीजे तेव्हापासूच रुजली.१९४२मध्ये स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युलकास्ट फेडरेशन पक्षाने १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. १९५२च्या निवडणुकीत मात्र १२ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे रूपांतर पुढे रिपब्लिकन पक्षात झाले. मात्र अल्पावधीतच रिपब्लिकन पक्षातील फूट पडली आणि ती कायमच राहिली. १९५८ मध्ये फुटलेला रिपब्लिकन पक्ष पुढे १९६४ आणि १९६५ मध्ये सातत्याने फुटत गेला. जवळपास ३२ गटांमध्ये हा पक्ष विखुरला गेला आहे.सत्तेतील सहभागासाठी रिपाइंच्या एकीकरणासाठी समाजाने पुढाकार घेतला आणि जनतेच्या रेट्यामुळे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रा. सू. गवई हे सारे नेते एकत्र आले. १९९८मध्ये झालेल्या एकीकरणाच्या प्रयोगामुळे चौघेही लोकसभेत निवडून गेले. मात्र या दलित नेत्यांची वैचारिक भूमिका आणि राजकीय महत्त्वाकांक्षा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. त्यामुळे मधल्या काळातील ऐक्य अल्पायुषीच ठरत गेले. रिपाइं नेत्यांची वैयक्तिक भूमिका सातत्याने समोर आली असली तरी भिन्न पक्ष तसेच स्वपक्षाच्या माध्यमातून या नेत्यांनी रिपब्लिकनचा दबदबा कायम ठेवला. या पक्षामागे त्या नेत्याचे नाव जोडले गेले असले तरी सत्ता संपादनाच्या केंद्रस्थानी हे नेते कायम राहिले.विदर्भात कवाडे यांचे अस्तित्व आणि विद्यमान आमदार, आठवले हे केंद्रात मंत्री तर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्ह्यात आणि राज्यात या नेत्यांची ताकद कमी-अधिक प्रमाणात कायम असून त्याची दखल प्रत्येक सत्ताधाऱ्याला घ्यावीच लागली आहे.वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांचे राज्यातील महत्त्व वाढले आहे. तर केंद्रात मंत्री असलेल्या आठवले यांचे नाशिक जिल्ह्यात मोठे प्राबल्य आहे. १७२ उपसरपंच, १८५ सरपंच, २७ नगरसेवक, मनमाडचे नगराध्यक्षपद, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्षपद, नाशिक मनपात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने रिपाइंचा उमेदवार आहे. आठवले आणि आंबेडकर यांनी आपल्या गटाचे उमेदवार विधानसभेत उतरवून अस्तित्व कायम ठेवले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक