सप्तशृंगगडावरील घाटात दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:24 IST2019-07-04T16:24:16+5:302019-07-04T16:24:41+5:30

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील घाटातील रस्त्यात गुरूवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. त्यामुळे कूठलीही जिवित हाणी झाली नसली तरी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहने चालवितांना अडथळा येत होता.

 The rift in the Ghats in Sapshatungaad collapsed | सप्तशृंगगडावरील घाटात दरड कोसळली

सप्तशृंगगडावरील घाटात दरड कोसळली

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील घाटातील रस्त्यात गुरूवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. त्यामुळे कूठलीही जिवित हाणी झाली नसली तरी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहने चालवितांना अडथळा येत होता. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीच रस्त्याच्या मधोमध पडलेले दगड स्वत:हूनच बाजूला करत वाहने जाण्या-येण्यासाठी थोडा रस्ता मोकळा करून दिला. गेल्या काही दिवसांपासून सप्तशृंगगडावर प्रथमच मुसळधार पाऊस झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ऊन्हामूळे डोगंराला तडे जातात व त्या तड्यात पाणी गेले की आपोआपच दरड कोसळण्यास सूरूवात होते. दर पावसाळ्यात दरड कोसळत असतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून सकाळी दरड कोसळली असून अद्यापही दूपार पर्यंत कूठल्याच प्रकारे दरड हटवली नसून संबंधित विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे येणारे भाविक आरोप करत आहे. पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसिबी मशीन आणूण ठेवावे. जेणे करून त्वरित दरड हटविण्यास मदत होईल. तसेच जे डोगंराचे निसटणारे दगड आहे ते काढून घेण्यात यावे व डोगंरास लोखंडी संरक्षक जाळी बसविण्यात यावी. जेणे करून भविष्यात कूठलीही जिवित हानी होणार नाही अशी मागणी भाविकांतर्फ करण्यात येत आहे.

Web Title:  The rift in the Ghats in Sapshatungaad collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक