रायडर अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2017 18:08 IST2017-06-09T18:08:59+5:302017-06-09T18:08:59+5:30
सातपूर औद्योगिक वसाहतीतील इस्टर प्रायझिंस या कंपनीत काम करीत असताना अंगावर वजनदार रायडर पडल्याने गंभीर जखमी

रायडर अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील इस्टर प्रायझिंस या कंपनीत काम करीत असताना अंगावर वजनदार रायडर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा गुरुवारी (दि़८) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ शोभनारायण लक्ष्मण प्रजापती (रा.मीनाताई ठाकरे गार्डनशेजारी शिवाजीनगर) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इस्टर प्रायझिंस कंपनीत बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास प्रजापती हे नेहेमीप्रमाणे काम करीत होते़ यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वजनदार रायडर पडल्याने ते गंभीर जखमी झाले़ त्यांना कंपनी प्रशासनाने उपचारासाठी तत्काळ ईएसआय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़ मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़
या घटनेची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.