सायकलवर स्वार ‘कोब्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:04 IST2017-10-27T01:04:51+5:302017-10-27T01:04:58+5:30
चेतनानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाला अन् रहिवाशांची पाचावर धारण बसली. संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बंगल्याच्या आवारात सरपटल्यानंतर सायकलच्या आधारे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात कोब्रा पुढील चाकाच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला.

सायकलवर स्वार ‘कोब्रा’
नाशिक : चेतनानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाला अन् रहिवाशांची पाचावर धारण बसली. संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बंगल्याच्या आवारात सरपटल्यानंतर सायकलच्या आधारे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात कोब्रा पुढील चाकाच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला.
कुंपणाच्या भिंतीला लागून उभ्या असलेल्या सायकलवर चक्क कोब्रा स्वार झाला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांची सदर बंगल्याच्या आवारात नाग बघण्यासाठी गर्दी झाली होती. बंगल्याच्या संरक्षण कुंपणाच्या आतमध्ये नाग फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी तत्काळ ‘इको-एको’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवक अभिजित महाले यांनी बंगल्यात जाऊन नाग सुरक्षितरीत्या ‘रेस्क्यू’ केला व त्याची नोंद वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात केली. लवकरच शहरापासून दूर जंगलाच्या परिसरात नागाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.