नाशिक :चारचाकीच्या धडकेत रीक्षाचालक ठार, विहितगाव मनपा शाळेसमोरील अपघातात सासरे जावई जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 17:53 IST2023-05-04T17:53:22+5:302023-05-04T17:53:31+5:30
या अपघातात रीक्षातील प्रवाशी रमेश बहोत व दिनेश वानखेडे हे दोघेही जखमी झाले.

नाशिक :चारचाकीच्या धडकेत रीक्षाचालक ठार, विहितगाव मनपा शाळेसमोरील अपघातात सासरे जावई जखमी
मनोज मालपाणी
नाशिक : विहितगाव चौफुली येथून प्रवासी भाडे घेऊन वडनेरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला विहितगाव मनपा शाळेसमोर समोरून भरता वेगात आलेल्या छोटा हत्तीने जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी होऊन मयत झाला असबव रिक्षातील प्रवासी असलेले सासरे व जावई जखमी झाले आहेत.
गोरेवाडी शास्त्रीनगर येथे राहणारे रमेश श्रीचंद बहोत हे घरी आलेले जावई दिनेश सुखदेव वानखेडे यांना वडनेर येथे सोडण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विहितगाव चौफुली येथून रिक्षा एम एच १५ एके ५२१२ मध्ये बसले होते. सासरे व जावई व रिक्षा चालक लक्ष्मण ज्ञानेश्वर पाचरणे (४७, रा. गुरुदेव रो हाऊस, रायबा हॉटेल शेजारी) पाथर्डी हे वडनेरच्या दिशेने जात असताना विहितगाव मनपा शाळेसमोर समोरून भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक लक्ष्मण पाचरणे यांच्या हातापायास व गुप्तांगास मार लागून गंभीर धुखापत झाली.
या अपघातात रीक्षातील प्रवाशी रमेश बहोत व दिनेश वानखेडे हे दोघेही जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी तिघा जखमींना तातडीने बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र रिक्षाचालक लक्ष्मण पाचरणे गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी छोटा हत्ती चालक किरण शांताराम सोळंके रा. श्रमिकनगर, सह्याद्री कॉलनी जवळ, संगमनेर यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.