सुरगाणा : येथून जवळच असलेल्या प्रतापगड फाटानजीक प्रवासी रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाले. सुरगाणा येथे आठवडे बाजारासाठी आलेल्या उंबरविहीर येथील रिक्षा चालकाचे प्रतापगड फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. यात पिलाजी गावीत (वय ६८), हरिश्चंद्र गावीत (२४), दुर्गा गावीत (१९), परशराम गायवन (५२), सुरेश गवळी (४५), मगजी वाघमारे (५०), श्रीराम भोये (६५) किरकोळ जखमी झाले आहेत, तर परशराम पिठे (६५) यांना डोक्याला व झुणका पिठे (५८) यांना नाकाला जखम झाली आहे. काहींनी घटनास्थळावरून परस्पर घरचा रस्ता धरला. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी सुरेश पांढुर्ले, योगीता जोपळे उपचार करीत आहेत.
रिक्षाला अपघात; नऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 01:01 IST