जिवंत काडतुसांसह परप्रांतीयास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:41 IST2018-11-22T22:40:52+5:302018-11-22T22:41:19+5:30
सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्तूल, गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतीय इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाइल व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

जिवंत काडतुसांसह परप्रांतीयास अटक
सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव वसाहतीत सापळा रचून बेकायदा देशी पिस्तूल, गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रांतीय इसमाला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाइल व ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवर नियंत्रण तसेच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह पथकाने कंबर कसली आहे. या पथकाला गुरुवारी सिन्नरजवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत मालाविरुद्धचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबºयामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर-शिर्डी रोडवरील बेदमुथा कंपनीसमोर काही परप्रांतीय इसम अवैधरीत्या बाळगून गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयित रामबाबू हिरालाल गौतम (४५) रा. भारतगज (उतर प्रदेश) हल्ली मुसळगाव एमआयडीसी यास ताब्यात घेतले. होंडा अॅक्टिव्हा मोपेड दुचाकीच्या डिकीत एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कठ्ठा व तीन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्रपरवाना मिळून आला नाही. संशयिताकडून ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर संशयिताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, रवींद्र वानखेडे, प्रकाश चव्हाणके, प्रदीप राठोड पथकात सहभागी होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या पंधरवड्यात अवैधरीत्या अग्निशस्र बाळगणारे एकूण सात आरोपींविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करून पाच देशी बनावटीचे पिस्तूल व एक गावठी कट्टा, पंधरा जिवंत काडतुसे, सहा मॅगझिनसह गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकल व एक स्विफ्ट कार हस्तगत केली आहे.