राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा
By Admin | Updated: April 8, 2015 01:01 IST2015-04-08T01:01:07+5:302015-04-08T01:01:47+5:30
राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा
नाशिक : राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नाशिक जिल्'ात होत असून, त्यापार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मंगळवारी घेतला. ग्रामपंचायतीचे मतदान आटोपल्यानंतर लगेचच तासाभराने मतमोजणी करण्याबाबत सहारिया यांनी मते जाणून घेतले; परंतु त्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडून काही जागांवर एकच उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येत्या २२ एप्रिल रोजी नाशिक जिल्'ातील ५९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर १४९ पोटनिवडणुका होणार असून, या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून त्या वादात सापडल्या होत्या, परिणामी निवडणूक तयारीला पुरेसा वेळ यंत्रणेला मिळतो की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर सहारिया यांनी जिल्हाधिकारी व सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तयारी जाणून घेतली. त्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच मतदानाची तासानिहाय अचूक आकडेवारी देण्याच्या सूचना करण्यात आल्या. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून देण्यात आलेली असल्याने त्यांना त्याची जाणीव करून देण्यात यावी व खर्चावर देखरेख ठेवून नंतर एक महिन्याच्या आत खर्चाचा तपशील घेण्याचेही त्यांनी बजावले. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्याचे व याठिकाणी पुरेसे पोलीस बळ वापरण्याची शिफारसही त्यांनी केली.