मोदी घेणार स्मार्ट शहरांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:12 IST2017-08-18T23:59:22+5:302017-08-19T00:12:27+5:30
देशभरातील ६० शहरांचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आल्यानंतर त्या-त्या शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (दि.२३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. त्यात नाशिक शहराचाही समावेश आहे.

मोदी घेणार स्मार्ट शहरांचा आढावा
नाशिक : देशभरातील ६० शहरांचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आल्यानंतर त्या-त्या शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (दि.२३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार आहेत. त्यात नाशिक शहराचाही समावेश आहे.
बुधवारी दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. त्यात स्मार्ट शहरे घोषित केलेल्या ६० शहरांनी कोणते प्रकल्प हाती घेतले, कोणते प्रकल्प कार्यवाहीत आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. नाशिक महापालिकेनेही स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून, महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यानाचे नूतनीकरण आदी कामांनाही मंजुरी दिलेली आहे. या कामांचे सादरीकरण यावेळी केली जाणार आहे.